Saturday, September 13, 2014

सुसाट सफर - लेह लडाखची

सुसाट सफर - लेह लडाखची

              दोन - तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही नुकतेच युरोप सफरीवरून परत आलो होतो. आमचा एक मित्र आमच्या घ्ररी आला होता. त्याच्या बरोबर युरोप टूर चे फोटो पाहणे वगैरे चालले असताना  तो म्हणाला थांबा एक गंमत दाखवतो आणि त्याने खारदुंग ला वरून काढलेला एक फोटो दाखवला आम्ही आश्चर्यचकित झालो म्हंटले हा कोणत्या देशातील फोटो आहे ? तो म्हणाला अरे भारतातील हिमालयामधील लेह या ठिकाणचा फोटो आहे आणि हाच तो जगातील सर्वात उंच गाडी रस्ता ( Highest Motorable Road ) खारदुंग ला. (खिंडीला लडाखी भाषेत 'ला' म्हणतात आणि तलावाला 'Tso'.) उंची १८३८० फुट. त्याचे ते फोटो बघताना हे नक्कीच जाणवत होते कि हा रस्ता, लेह - लडाख सुंदर असले तरी दुर्गम आहे. तिथे जाणे अवघड आहे पण त्या क्षणी एक गोष्ट मात्र नक्की ठरवली कि आता जमेल तेव्हा लेह - लडाख बघायचेच. 


आणि आता या क्षणी मी देखील माझ्या पतीसोबत याच खारदुंग ला टॉप  वर उभी आहे. उर अभिमानाने, राष्ट्रप्रेमाने भरून आलाय, श्वास धपापतोय, पण तो चालण्यामुळे नव्हे तर विरळ हवेमुळे. माझ्या बरोबर आलेल्या २३ जणांच्या भावना देखील साधारण अशाच …आणि हि अशक्यप्राय गोष्ट शक्य झालीय ती 'सुसाट' या ग्रुप मुळे.


साधारण मार्च - एप्रिल मध्ये आमच्या मित्राने  आम्हाला विचारले कि 'सुसाट' चे आशु-विनय दरवर्षी प्रमाणे ऑगस्ट मध्ये लेह-लडाख टूर आयोजित करतायत, तुमची इच्छा होती न जायची?  मी विचारतो त्यांना …. !
आम्ही करू शकू ना ही  टूर ? विरळ हवेचा काही त्रास तर नाही होणार ना  ? असे अनेक विचार डोक्यात यायला लागले. 'सुसाट' च्या विनय शी बोलणे झाल्यावर समाधानकारक उत्तरे मिळाली व आमचा जाण्याचा बेत नक्की झाला व आमची विमानाची तिकिटेही मुंबई - श्रीनगर बुक झाली. 
लेह -लडाख परिसर हा जम्मू काश्मीर राज्यात येतो. जम्मू - काश्मीरची कारगिल व लडाख अशा दोन प्रांतात (जिल्ह्यात) विभागणी केली आहे. लेहला रस्त्याने जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मनाली-केलॉग-सारचू -पांग-उपशी- लेह. हा मार्ग मोटरसायकल ने जाणा-याना चालेन्जिंग वाटतो त्यामुळे सहसा बायकर्स या मार्गाने लेह गाठतात. तर दुसरा मार्ग श्रीनगर -द्रास -कारगिल -लामायुरू - लेह. हे दोन्ही मार्ग लेह येथे मिळतात. हा दुसरा मार्ग तुलनेने सोपा आहे व येथे landslide चा धोका थोडा कमी असल्याने आपण या मार्गाची निवड केली आहे. आम्ही निघण्याच्या आधी सर्व टूरला जाणा -या सहभागींची जी सभा झाली त्यात ही  माहिती आयोजक देत होते. एकूण मोहिमेत २० जण सहभागी होणार होते. साधारण वयोगट हा २० ते ६० असा होता व त्यात साधारण ६ कपल्स होती. हे सर्वजण मुंबई - पुणे - अहमदनगर येथील रहिवासी होते. आमच्या सर्व शंकांचे निरसन, high altitude sickness होऊ नये म्हणून घ्यायची काळजी व अगदी कायकाय बरोबर घ्यायचे व ते कसे bag मध्ये / havor sack मध्ये भरायचे याचेही मार्गदर्शन केले. आणि आमचा उत्साह प्रचंड वाढला. आम्ही सर्व तयारी करून निघण्याच्या दिवसाची वाट बघू लागलो.
                  विमानाने थेट श्रीनगर गाठल्यावर तेथे आयोजक व आमच्या टेम्पो traveler आमची वाटच बघत होत्या . सर्वजण वेगवेगळ्या फ्लाईट नी आलो तरी एकत्रच श्रीनगर हॉटेलवर पोहोचलो. तो दिवस श्रीनगर भटकंती, दल लेक, शिकारा सैर व शॉपिंग मध्ये संपला देखील. दुस-या दिवशी सकाळी लवकर सोनमर्ग मार्गे कारगिल गाठायचे होते. सोनमर्ग ला भरपेट नाश्ता झाला. तेथून पुढेच खूप अवघड असा झोझिला (पास) होता आणि लहरी निसर्गामुळे ३-४ तास झोझिला घाटात खोळंबा झाला. Landslide  झाल्याने B.R.O. - JCB ने माती दूर करत असताना गाड्यांच्या लांबचलांब रांगा घाटात लागल्या.
अर्थात ते ३ - ४ तास आम्ही सार्थकी लावले. राखी पोर्णिमा दुस-याच दिवशी होती. आम्ही त्या रांगेत उभ्या असलेल्या मिलिटरीच्या ताफ्यातील जवानांना राख्या बांधल्या. पुढे द्रास ला 'विजय पथ' हे कारगिल विजयाचे स्मारक व म्युझियम पहिले. जवानांना भेटलो. उर अभिमानाने भरून आला. सर्व जवानांना व त्यांच्या शौर्याला सलाम करून , रक्षाबंधन करून कारगिल मुक्कामी थोडे उशीराच पोहोचलो. सोनमर्ग सोडल्यावर झोझिला (पास) नंतर जाणवलेली एक गोष्ट म्हणजे हवेत जाणवणारा फरक, श्वास घेताना विरळ हवेमुळे होणारा थोडासा त्रास आणि निसर्ग सौंदर्यात झालेला आमुलाग्र बदल. सोनमर्ग पर्यंत हिरवाईने नटलेले डोंगर नंतर उघडे बोडके झाले आणि सर्वत्र वाळूंचे विविधरंगी पर्वत दिसू लागले.
                 कारगिल नंतर चा दिवस होता राखी पौर्णिमेचा . तो दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला तो टूर आयोजकांच्या आयडियेच्या कल्पनेमुळे. आम्ही सकाळी निघालो ते सर्वजण पोहोचलो LOC वरील जवानांच्या एका कॅम्प वर. तेथे आमचे जोरदार स्वागत झाले.
सजवून ठेवलेले ओवाळायचे तबक व त्यात सुंदर राख्या ठेवल्या होत्य. आम्हाला बसण्यासाठी एक शामियाना उभारला होता. आणि त्यानंतर एक सुंदर राखीपौर्णिमेचा - रक्षा बंधनाचा कार्यक्रम सुरु झाला. आम्ही सर्व जणींनी उपस्थित जवानांना ओवाळून त्यांना राख्या बांधल्या. जवानांच्या चेहे-यावरील आनंद तर ओसंडून वाहत होता आणि आमच्या मनात होता भावनांचा कल्लोळ. या सर्व प्रसंगाचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्य. पण एक मात्र नक्की कि हि राखीपोर्णिमा आमच्या मनावर कायमची कोरली गेली.
येथे येणा-या सर्व पर्यटकांना हेच सांगणे आहे कि शक्य असेल तर LOC वरील मिलिटरी  कॅम्प ला अवश्य भेट द्याच ( यासाठी पूर्व परवानगी आवश्यक असते) येथे तुमचे नक्कीच स्वागत होईल.
या नंतरचा मुक्काम अल्ची या गावी होता. तेथे बुद्ध मंदिर व एक धरण आहे. रहायला हे ठिकाण नितांत सुंदर आहे. पुढील दिवशी आम्ही लामायुरू ही मोनास्टरी व पत्थरसाहिब हि दोन ठिकाणे पाहून लेह ला पोहोचलो. लामायुरू या मोनास्टरी समोरील डोंगर व त्यावरील वेगळ्या रंगाची माती / वाळू चंद्रभूमी   सारखी दिसते म्हणून याला Moonland असेही म्हणतात. पत्थर साहिब हा शीख धर्मियांचा गुरुद्वारा असून येथे डोके टेकवल्या खेरीज भारतीय सेनेची एकही गाडी तसेच एकही पर्यटक पुढे जात नाही. वाटेत जाताना एक Magnetic हिल नावाचे आश्चर्यकारक ठिकाण लागते. या डोंगरावर  चुंबकीय भार आहे त्याचा परिणाम धातूंच्या वस्तूंवर होतो व त्याचे प्रात्यक्षिक देखील आमच्या गाडीवर झाले...
            आणि बघता बघता - लेह मध्ये आपले स्वागत असो - अशा कमानीने आमचे स्वागत केले. लेह मध्ये प्रवेश केल्याबरोबर आपल्याला दिसते ते 'हॉल ऑफ फेम' हे लष्कराने बांधलेले वॉर म्युझियम. येथे लेह चा संपूर्ण इतिहास व आजपर्यंत या परिसरात झालेल्या युद्धांचा समग्र इतिहास मांडला आहे तसेच  या युद्धांमध्ये शहीद झालेल्या वीरांचे फोटो व त्यांचे एक भव्य स्मारक उभारले आहे. येथे युद्धात वापरण्यात आलेली शत्रूसैन्याकडील  युद्धसामग्री प्रदर्शित केली आहे तसेच सियाचीन या अतिशय दुर्गम भागातील अति उंचीवरील चौकीवर रहाणा-या सैनिकांबद्दलची संपूर्ण माहिती देणारे एक दालन आहे. 
         लेह हे अतिशय सुंदर शहर असून तिथून दूर दूर हिमाच्छादित शिखरांचे मनोहारी दर्शन होते. हे शहर थंडीमध्ये पूर्ण बर्फाच्छादित असते.  लेह हे  समुद्रसपाटी पासून ११५०० फुट उंचीवर असून येथुन पुढील प्रवास त्याहून जास्त उंचीवरून आम्हाला करायचा होता. लेहला पोचल्याच्या दुस-याच दिवशी १८३८० फुटांवरील खारदुंग ला  पार करून आम्ही नुब्रा valley त प्रवेश केला. डेस्कीट या गावी ओपन बुदद्धा ही अतीभव्य, जवळ जवळ ४ मजली उंच बुद्धाची मूर्ती बघून आम्ही हुंडर या ठिकाणी मुक्कामाला पोहोचलो.
हुंडर या ठिकाणी चक्क राजस्थान सारखे वाळवंट व SAND DUNES बघायला मिळतात. येथेच ते दोन वशिंड (Double Hump) वाले उंट आहेत. या उंटावरील   आनंदी  सफरीने या दिवसाची सुंदर सांगता झाली. पुढील दिवशी जर जास्त प्रवास होता. आम्ही वारीला मार्गे थेट पेंगोंग या ठिकाणी जाणार होतो त्यामुळे सकाळी लवकर निघालो. साधारण संध्याकाळी ४ वाजता पेंगोंग लेकचे प्रथम दर्शन घडले. हा लेक प्रचंड मोठा असून त्याचा फक्त एक तृतियांश भाग भारतात तर दोन तृतीयांश भाग चीन मध्ये आहे. या लेक मध्ये दिसणा-या निळ्या - हिरव्या रंगांच्या अनेकविध छटा हे याचे वैशिष्ट्य. हा लेक दिसल्यावर सर्व जणांमध्ये विशेषत: फोटोग्राफर्स मध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आणि लेकची व माणसांची विविध छायाचित्रे कॅमे-यात बंदिस्त झाली. 
             येथून पुढील प्रवास हा लेह मार्गे मनालीच्या दिशेने तसा परतीचा प्रवास म्हणता येईल. परत जाताना लेह जवळील मोनास्ट्रीज, शे palace, सिंधू घाट , रांचो ची शाळा ( ३ इडियट फेम ), झोरावर palace , या सर्वांना भेट देऊन सो मोरीरी व सो कर हे थोडे आडवाटेला असलेले लेक बघितले. सो मोरीरी ला कडाक्याच्या थंडीचा व टेन्ट मधील मुक्कामाचा अनुभव जरा  हटकेच. नंतर  पांग ,सारचू करत केलोंग येथे मुक्काम व रोहतांग वरून मनाली. हा रस्ता तसा अवघड, खडतर पण बरोबर च्या मंडळींमुळे, अंताक्षरी खेळत, गाणी म्हणत, गप्पा मारत व निसर्ग सौंदर्य न्याहाळत सुकर झाला. लेह ते मनाली या भागातील निसर्गाचे एक वेगळेच सौंदर्य आहे हे पर्वत थोडे रौद्रभीषण आहेत आणि इथला निसर्ग  थोडा लहरी देखील आहे. 

             आणि मनालीत आल्यावर चक्क आपल्या घरीच पोहोचल्याची भावना मनामध्ये जागृत झाली. एवढा खडतर प्रवास निर्विघ्नपणे पार पाडला म्हणून देवाचे आभार मानले. अर्थात यात सर्वात मोठा वाटा नियोजनाचा. अतिशय शिस्तबद्ध व खेळीमेळीच्या वातावरणात चाललेला हा प्रवास. सुंदर हॉटेल्स, टेन्टस, चविष्ट नाश्ता , जेवण, सहभागींना काहीही कमी पडू न देण्याचे आयोजकांचे प्रामाणिक प्रयत्न यामुळेच मी व माझे पती ही  सहल यशस्वीरीत्या पूर्ण करू शकलो. पुन्हा अशाच सुंदर टूरला भेटण्याचा निश्चय करत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. 

सौ. वसुधा साळवेकर  

लेखिका या उद्योजिका असून अहमदनगर च्या रहिवाशी आहेत. 
सदर लेखात वापरलेले फोटो टूर दरम्यान काढले असून ते कविता जोशी, आशुतोष साळवेकर, रौनक राजे यांचे आहेत.

सदर टूर 'सुसाट रिबेल ऑन व्हील्स' या ग्रुप ने दिनांक  ८ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०१४ या कालावधीत आयोजित केली होती व त्यात एकूण २४ जण सहभागी झाले होते.  


                                        
                 



Friday, September 12, 2014

दारू पिताना पाळावयाचे काही नियम

दारू पिताना पाळावयाचे काही नियम:
१) नेहमी उच्च प्रतीची दारू प्यावी, उदा. स्कौच, व्हिस्की, इ. आणि स्कौच, व्हिस्की पिणार्यांना प्राथमिक मानापानाचे स्थान द्या, आणि बियर, वोडका पिणार्यांना दुय्यम स्थान द्या.
२) दारू नेहमी कट ग्लासमधेच प्यावी कुठल्याही साध्या बियर वगैरेच्या ग्लास मध्ये व्हिस्की पिउ नये.… प्लास्टिक किंवा स्टील च्या ग्लास मध्ये दारू पिऊ नये, कारण दारू आणि पिणारा दोघांचाहि त्यात अपमान आहे.
३) दारूमध्ये एक बोट बुडवून हवेत शिंतोडे उडवण्याचा येडझवेपणा करून आपली लायकी देशी दारूची आहे असे समोरच्याला भासवून देऊ नका… या सर्व अंधश्रद्धा आहेत हे लक्षात ठेवा.
४) शक्यतो दारू पिताना चकली, चना दाल, मुंग दाल, वेफर्स, सेंग, इ. सारखे वारंवार येणारे चखना पदार्थ टाळावे त्याऐवजी शक्यतो चीजक्यूब, चीझ्लींक, सलाड, किंवा नोनवेज मध्ये फ्राईड पदार्थहि उत्तम पण लिमिट मध्ये असावे.
५) बर्फाचे जास्तीत जास्त दोनच तुकडे उत्तम, (टीप - on the rocks मारणार्यांनी फक्त पेग आणि ग्लासभर बर्फ घेतल्यासहि चालेल)
६) स्टरऱ (मिसळवण्याची दांडी) असायला हवी (जर एखादा त्या दांडीची वाट न पाहता direct पेग पीत असेल तर तो भिकारचोट आहे असे मानावे)
७) जर तुमच्यातील एखादा दारू सोबत हावरटसारखा चखणा जास्त खात असेल आणि तुम्हाला काही चखणा ठेवत नसेल तर समजावे तो यडझवना आणि नंगचोट आहे त्यामुळे पुढच्या दारूच्या पार्टीला आपण त्याला आमंत्रण देऊ नये.
लक्षात ठेवा दारू पिताना जो चखणा जितका कमी खातो त्याला पिनार्यांमध्ये तितका जास्त मान मिळतो.
विशेष टीप : हाच नियम दारू न पिणारा जो फक्त थम्स अप घेऊन बसलाय त्याच्यावरहि लागू पडतो कारण तो दारू पीत नाही म्हणून इतरांवर उपकार करत नसतो त्यामुळे त्यानेही चखना कमीच खावा.… दारू प्यायला बसण्याचा उद्देश्य हा गप्पा मारणे हा असावा चखणा खाणे हा नाही.
८) मध्ये कुणी कितीही घाई केली तरी मेनकोर्स हा दारू संपल्यावरच मागवावा मध्ये जेवण मागवू नये… जेवण शेवटीच करावे.…. सिगारेट पिणार्यांनी आधी सिगारेट न पिणार्यांची परमिशन घेऊनच सिगारेट पेटवावी अन्यथा जर इतरांना त्रास होत असेल तर बाहेर जाऊन सिगारेट ओढावी.
९) दारू पिण्यात कोटा, Stamina वगैरे सगळ्या फालतू गोष्टी आहेत… त्यामुळे एखाद्याने नाही म्हटल्यास त्याला आग्रह करू नये आणि कधीही पिण्यामध्ये शर्यत लावू नये, आणि कधीही लेडीज सर्विस, डान्स बार या गोष्टींना बळी पडू नये ते फक्त एक भावनिक गुंतागुंतीचे आकर्षित करणारे मायाजाल आहे.
१०) दारू पिल्यावर जर एखादा भावनिक होत असेल किंवा "तू माझा भाऊ-दादा", "तुझ्यासाठी कायपण" वगैरे सारखे फालतू डायलोग मारत असेल किंवा राडा करत असेल तर त्याच्या तोंडावर सोडा मारा … आणि पुढच्या वेळी त्याला टाळा. … थोडक्यात ज्याच्या स्वभावामध्ये पिल्यानंतर विलक्षनीय परिवर्तन होते अशांसोबत बसणे कधीही अयोग्यच.
११) काहींना दारू पिल्यावर रंडीबाजी करण्याचा छंद असतो जर अशांनी आपणास रंडीबाजीचा आग्रह केल्यास त्यांचा बांबू पलटी करून त्यांच्याच पार्श्वभागी घालून द्यावा पण आपण आपली नितीमत्ता सोडू नये.
१२) दारूची किंमत हि वाढलेली असल्या कारणी बजेटचा विचार करूनच प्यायला बसावे एखादा आपल्याला पाजतोय म्हणून चुत्यासारखे पीत सुटू नये, त्याच्या खिशाचाहि विचार करावा, कधी ९० तर कधी जास्तीत जास्त १ Quarter बस आणि शक्यतो थांबावे.…
लक्षात ठेवा तुम्ही "टाकी" आहात याची समोरच्या व्यक्तीला भनक लागू देऊ नका नाहीतर तुम्हाला आमंत्रणे यायची बंद होतील.…. महागाई वाढली आहे हे लक्षात ठेवा.
१३) जशी दिलेली दारूची आमंत्रणे आपण आनंदाने स्वीकारतो तसेच इतरांना आपण आमंत्रणे आनंदाने दिलीही पाहिजेत.
दारू हि आलेले क्षण आनंदाने उपभोगण्यासाठी आहे… तिचा आनंद घ्या उपहास करू नका, इमोशनल होऊ नका, उलट्या करू नका, लफडे, राडे करू नका, आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा, गाडी व्यवस्थित चालवा आणि सुखरूप घरी पोहचा.

धन्यवाद !

From Internet - Cut Paste Art

Monday, August 25, 2014

भारतातील जाहिरातींनी मला काय काय शिकवले?

भारतातील जाहिरातींनी मला काय काय शिकवले?

1. करीना ला Dandruff समस्या, कटरीना ला सूखे बाल, शिल्पा ला केस गळणे समस्या, आणि प्रियंका ला चिप चिप... या समस्या आहेत ..
2. तुम्हाला जर कोंडा आणि केस गळणे या समस्या एकसाथ असतील तर अर्धा ब्लैक आणि अर्धा पांढरा असा ड्रेस घालावा, याने कोंडा बरोबर ड्रेस च्या पांढर्या भागात तर गळालेले केस बरोब्बर ड्रेस च्या काळ्या बाजुला पडतील....
3. जर तुमची बायको हॉट असेल तर शेजार्या कड़े त्या ख़ास ब्रांड चा deodorant नसल्याची खात्री करा....नाहीतर तुमचे काही खरे नाही...
4. तुमचा रंग हां तुमच्या Qualification पेक्षा जास्त महत्वाचा आहे..
5. जर तुमच्या घरात मीठ नसेल तर टूथपेस्ट वापरू शकता.
6. 1995 तुमचा टूथपेस्ट मधे मीठ असणे धोकादायक होते... पण अता 2007 पासून पुढे - तीच कंपनी - तुमचा पेस्ट मधे नमक आहे का?
7. प्रत्येक टूथपेस्ट ब्रांड हां जगातला नं. 1 चा ब्रांड आहे, आणि ते सर्व ब्रांड जगातील सर्व डेंटिस्ट वापरण्याचा सल्ला देतात...
8. deodorant हां फ़क्त मुली पटवण्यासाठीच वापरायचा असतो...
9. deodorant वापरला की मुली असतील तिथून, असतील त्या अवस्थेत तुमचा मागे पळत येतात...
10. सर्व cold drinks तुमची भीती घालवतात, आणि जर तुम्ही ते रोज प्यायले तर सुपरमैन च्या आसपास तुमची ताकद नक्की पोहचु शकेल...
11. सर्व सुपरस्टार्स इतके गरीब/ लाचार आहेत की ते एका कोल्डड्रिंक ला 10 रूपये देण्यापेक्षा जिव धोक्यात घालणे पत्करतात.
12. शैम्पू च्या जाहिराती मधील Special effects हे AVATAR सिनेमातील effects पेक्षा जास्त खरे वाटतात.
13. खर्या फ्रूट-जूस पेक्षा ही जास्त फ्रूट्स शैम्पू आणि साबणात असतात...
14. तुम्हीं जर त्यांचे टायर्स वापरले तर कितीही घाण आणि मोठें खड्डे असतील तरीही काहीही फरक पड़त नाही...
15. आपली गाडी कंपनीने सांगितलेल्या माईलेज च्या निम्मा माईलेज देते, तरीही कम्पनी चांगली आणि ट्राफिक वाईट असते...
16. तुम्ही dairy milk silk चोकोलेट पूर्ण चेहर्यावर पसरवल्या शिवाय खाऊ शकत नाहित...
17. कोणीही मोटरबाइक कामासाठी वापरत नाही... त्याचा उपयोग फ़क्त मुलींना घेउन, नादितुन/ हाईवे वर फिरण्या साठी होतो...
18. सर्व साबण 99.9 किटाणुंचा नाश करतात.
19. Bacardi हे फ़क्त म्यूजिक cd's बनवते, आणि kingfisher / directors special फ़क्त मिनिरल वाटर बनवतात...
20. आई आणि मुली या जेव्हा गप्पा मारतात तेव्हा त्या फ़क्त hair oil बद्दलच बोलतात.
21. शैम्पू, तेल हे टाळूला न लावता केसांच्या टोकावर लावावे.
22. आपल्याला मरणाची भीती खुलेआम फ़क्त विमा कंपन्याच घालू शकतात.
23. आपण कितीही काळेकुट्ट असलो तरीही आपल्याला आपल्याच घरात राहणारी गोरीपान पण एकेकाळी काळीकुट्ट असलेली आपली सक्खी बहीण कुठले क्रीम लाउन गोरी झाली हे गुपित आपले लग्न होत नसल्यावरच ती सांगते. अणि मुलगा आपल्याला आठवडयात पसंद करतो.
24. फ़क्त idea चे इन्टरनेट वापरल्याने तुम्हाला नेटवर खरी माहिती मिळते, आणि मग कोणीही उल्लू बनवू शकत नाहित.
25. सर्व पंखे हे actually थंड वारा बनवतात...
26. चोकोलेट शेक प्यायल्याने उंची आणि बुद्धि वाढते. मग तुम्हाला बदाम, अक्रोड खाणे आणि व्यायामाची गरज भासत नाही.
27. (माझे फेवरेट)मार्किट मधे काल-परवाच उगवलेल्या कंपनीचे प्रोडक्ट्स सुपरस्टार्स गेली कित्येक वर्षांपासून वापरत असतात....
28. कमोड मधील कीटाणु हे कमीतकमी एक फुटभर लांबीचे असतात. आणि ते आपल्या मराठी, हिंदी भाषेत गप्पा मारतात....
29. उद्यावर आलेल्या परिक्षेपेक्षा तुम्हाला केस गळत आहेत याची चिंता जास्त असते ...
30. तुमच्या टूथपेस्ट मधे मीठ नसेल तर सावधान ! , सुपरस्टार्स कधीही माइक घेउन तुमचा बाथरूम चा दरवाजा उघडून आत येउ शकतील...
31. कुठल्याही प्रकारचा expert असेल तरीही तो नेहमी Laboratory मधे white coat घालूनच असतो.
32. तहान लागली की पाणी ऐवजी sprite प्यावे, त्यात कितीही साखर असली तरीही तुम्हाला तहान लागणार नाही.
33. आंबे कितीही महाग असले तरीही अम्ब्याचा अर्धा किलो pure रस slice मँगोला 20 रुपयात देते.
34. तुम्ही कितीही जाड असाल तरीही रूपा चे बनियान वापरल्याने पोट तर कमी दिसतेच पण बाइसेप्स ही चांगले दिसतात.
35. रूपा चे बनियान वापरल्याने तुम्हाला रांगेत मधे घुसून पहिला नंबर लावता येतो.
36. दाढी चांगली झाली की नाही पाहण्या साठी मुलीने हात फिरवण्याची गरज असते.
37. प्रत्येक शैम्पू तुमचा कोंडा 100% घालवतो.
38. वेफर्स खाल्ल्याने तुम्हाला मुलीला प्रोपोस करायची हिम्मत येते.... अणि मुलगी लगेच हो पण म्हणते.
39. हिरा हां फ़क्त "सदा" साठीच असतो. "हिरा है सदा के लिए"
*************आणि अती महत्वाचे******************
40.mutualfundinvestmentsaresubjecttomarketriskspleasereadtheofferdocumentscarefullybeforinvesting

Wednesday, June 5, 2013

आवडीचा पदार्थ

तुझ्या आवडीचा पदार्थ कोणता ? हा प्रश्नच खरंतर चुकीचा आहे आणि तो विचारणार्‍याला उत्तरही अभिप्रेत नसावं असं वाटेल इतका भारहीन आणि भावनाशून्य आहे. मी तर असल्या प्रश्नाला "तसं काही नाही " हे तद्दन निरर्थक उत्तर भिरकावतो. खाण्या-पिण्याच्या बाबतीत सढळ आणि मोकळं-ढाकळं वागायचं सोडून इंग्रजाळलेले म्यानर्स आणि एटीकेट्स कुरवाळत बसणं का रूढ झालं ते कळत नाही. चारचौघात शिष्टाचार पाळावेत हा संकेत आहे पण अस्खलित मनमोकळेपणा आल्याशिवाय खाद्य-योग साधेलच कसा?

"तू कुठल्या खाण्यासाठी जीव टाकशील ?" असं सरळ-सरळ विचारलं जावं आणि "जय भवानी जय शिवाजी" च्या जोशात मी "पुरणपोळी" पुकारावी असं मला नेहेमी वाटतं. पुरणपोळी ती पुरणपोळीच ! गूळपोळी, खवापोळी, सांजोरी, साटोरी, या सगळ्या तिच्याच बहिणी पण पुरणपोळीची सर कुणालाही नाही. उत्तम पुरणपोळी करणे हे काही साधं काम नाही. ते तर "येरा-गबाळ्याचे काम नोहे" ! ते तपश्चर्येचं फळ आहे. एका गृहिणीला म्हणे उत्तम पुरणपोळया जमल्या, त्याच पुरणपोळ्यांनी तिला राष्ट्रपती पद देऊ केलं अशी दंतकथाही (?) मी ऐकली आहे.

आमची अन्नपूर्णा आज्जी असेतो मी यथेच्छ पुरणपोळया हादडल्या. बिडाच्या मोठ्ठ्या काठवाल्या तव्यावर तवाभर पसरलेली पुरणाची पोळी एकदाही फाटलेली, उसवलेली मी बघितली नाही. पोळीला काठ आहेत की नाहीत हे कळायचं नाही. पापुद्राही रेशमी कापडासारखा पातळ ! त्यात जवळपास खाकी रंगाचं अगदी मऊ-सूत जिभेवर विरघळणारं पुरण.(माझं रंगसंगतीचं ज्ञान इतकं बेताचं आहे की माझी पोच सरकारी रंगाची उपमा देण्यापलीकडे जातच नाहीये.). माझे गतजन्मीचे काही भोग भोगायचे राहिले असतील म्हणूनच आज्जी गेल्यावर कित्येक वर्षे बहुतेक करून मूर्तीमंत वैगुण्याने नटलेल्या पुरणपोळया (त्या पोळ्यांना पुरणपोळ्या म्हणवतही नाही हो ! पण समजून घ्या) खाव्या लागल्या. मध्येच कधीतरी वाईट महादशेत लहानशी चांगली अंतर्दशा यावी तशी एखादी चांगली पुरणपोळी नमुन्यापुरतीच मिळायची. सर्वात मोठ्ठं वैगुण्य म्हणजे साखरेचं पुरण. साखर घालून शॉर्ट-कट पुरण करण्यापेक्षा त्या वाटेला जाऊच नये. पुरणात गूळच हवा आणि तोही लालसर तपकिरी रंगाचा. गुळाचा खमंगपणा हाच तर पुरणाचा प्राण आहे हे काय सांगून समजण्यासारखं आहे का ? त्याला अनुभवच हवा. बागेश्री गाताना, मंद्र निषादावरून शॉर्ट-कट मारून मध्य गंधार घेतला तर त्या बागेश्रीचा मुडदाच पडेल ना ? तसंच आहे. जाडजूड काठ-पदर, उसवण, पोळ्या अर्ध्या मोडून ठेवणे, जायफळ उगाळून न घालता किसून घालणे असले प्रकार एकवेळ क्षम्य आहेत पण तेही पुरण अव्वल असेल तरच. गूळ बारीच चिरायचा कंटाळा येतो म्हणून पुरणात साखर घालणे (आणि रंग धरावा म्हणून हळद) म्हणजे चालायचा कंटाळा आला म्हणून व्हील-चेयर घेण्यासारखे आहे.

माझ्या लग्नानंतर, सुमारे दोन वर्षांनी आम्ही जोडीने एका आज्जींकडे जेवायला गेलो. पुरणपोळीचा बेत होता. त्यांनी फारच सुरेख पोळ्या केल्या होत्या. मी त्यांना विचारलं "आज्जी, अध-पाव सरीचं पुरण केलं का हो ?" या प्रश्नावर त्या इतक्या खुलल्या की ते आजोबांनी बघितलं असतं तर त्यांना पुन्हा प्रपोज केलं असतं. असो. तर त्यांनी काही वेळ स्वत:चं कौतुक गायलं नंतर सुनेला हे पुरण जमत नाही म्हणून तक्रारीचा सूर लावला आणि मग म्हणाल्या "सांगलीला जाशील तेव्हा गजानन मिलच्या धोतरांची चार पानं घेऊन ये. दरवेळेस पुरणपोळया करायच्या वेळेस मला शोधत बसायला नको." आमच्या संभाषणातला हा भाग बायकोला बिलकुल कळला नाही. ती अत्यंत चमत्कारिक चेहेर्‍याने आमचं बोलणं ऐकत होती. परतताना रिक्षात बसल्या-बसल्या बायकोचा प्रश्न आला "अध-पाव सरीचं पुरण म्हणजे काय रे ? आणि धोतराचा पुरणपोळ्यांशी काय संबंध ?" मग मी तिला सर्वोत्तम पुरणपोळया करायची पद्धत सांगितली.

पोळ्यांसाठीचे पुरण करताना एक किलो डाळीला एक किलो गूळ शिवाय त्यावर अध-पाव सर (म्हणजे जास्त) गूळ घ्यावा. गूळ बारीकच चिरलेला असावा. खडे ठेऊ नयेत. पुरण चांगलं सरसरीत शिजवावं घट्ट करू नये, ते यंत्रातून वाटून घ्यावं, मग चौपदरी धोतराच्या धडप्यातून पुरण पिळून घ्यावं. असं केलं म्हणजे पोळ्या लाटताना सर्र-सर्र लाटल्या जातात, पुरण सगळीकडे नीट पोचतं. पुरण पिळून निघणार्‍या गोड पाण्यापासूनच कटाची आमटी करावी. ते पाणी काढायचं असतं म्हणूनच अध-पाव गूळ जास्ती घालावा म्हणजे पोळ्या अगोड होत नाहीत. इ.इ.

एव्हढी कष्टाची, उसाभर कामं केल्यावरच पुरणपोळया चांगल्या होतात हे ऐकल्यावर बायकोचा धीर खचणार होता. पण मी तिला मदत करण्याचा शब्द दिला आणि त्या पुढच्या रविवारपासून माझी महादशा संपली आणि उत्कृष्ट पुरणपोळ्या घरी मिळू लागल्या.
किरर्र 
संकलन 
श्री. अभिनव फडके यांच्या fb wall  वरून साभार ....

Wednesday, May 22, 2013

जेंव्हा तुझ्या बुटांना ...

जेंव्हा तुझ्या बुटांना ...

लहानपणी अभ्यास केला नाही, पानातले सगळे विनातक्रार संपवले नाही, 'वेड्यासारखे' वागले की आई-बाबा यऽ यऽ बुकलायचे. स्वयंपाकाच्या ग्यासची हिरवी रबरी नळी, छडी, झाडू, कमरेचा पट्टा, लाटणे, सांडशी, कपडे वाळत घालायची काठी यांपैकी कशाकशाचाही काहीही उपयोग होत नाही, हे कळून चुकल्यावर चपलेने अगर बुटाने मार खाणे ठरलेले असायचे. "जोड्याने हाणले पाहिजे कार्ट्याला!"असे त्यांच्यापैकी एकानेही जरी म्हटले तरी त्याचा अर्थ आई-बाबा उभयतांनी हाणणे म्हणजे 'जोड्याने' हाणणे हाच होतो, अशी बालमनाची पक्की समजूत झालेली. सत्यनारायणाच्या पूजेला जसे मेहूण जेवते (जोडा जेवतो), तसाच प्रसाद 'जोड्याने' मिळायचा. त्यामुळे अगदी आजतागायत अभ्यास न करणार्या नतद्रष्ट लहानग्यांपासून ते अगदी अमेरिकेच्या अध्यक्षमहाशयांपर्यंत कोणालाही 'जोड्याने' हाणले पाहिजे असे कोणी म्हटले की हाणणार्याग किमान दोन व्यक्ती तरी असाव्यात, असे चित्र आपसूकच उभे राहते. मात्र नजीकच्या भूतकाळात आमचा हा समज एका इराकी पत्रकाराने चुकीचा ठरवला. त्याने बुश महाशयांना चढवलेल्या बुटांच्या प्रसादावरून जोड्याने हाणणे म्हणजे एकाच व्यक्तीने दोन जोडे मारणे हा सुद्धा अर्थ होतो, हे सुद्धा मान्य करावे लागले. एका अर्थाला दुसर्या अर्थाची जोड (की जोडा) मिळाला.
काही संस्कृतींमध्ये जोडे फेकून मारणे हे उच्च प्रतीच्या, नीचपणे केलेल्या अपमानाचे व्यवच्छेदक लक्षण कसे काय असू शकते, हे बाकी आम्हांला अजून समजलेले नाही. पुण्यात कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त जोडे हाणायची जी संस्कृती विकसित झाली आहे, तिची लागण या बाकीच्या संस्कृतींना झाली नसावी. बाटा, लखानी किंवा तत्सम सिंधी-गुजराती चप्पल-बूट विक्रेत्यांचे धंदे पुण्यात नीटसे चालत नसल्याचे हेच एक मुख्य कारण असावे की तिथे जोडे हाणायचे असल्यास ते पायात घालावेच लागतात अशातला भाग नाही. तिथला मराठी माणूस जोडे हाणण्यात पटाईत असल्याने वडेवाले जोशी जरी एकमेवाद्वितीय असले, तरी जोडेवाले जोशी बरेच आहेत.
चप्पलबुटांची खरी गरज पडते ती मुंबईत. तिथे कफ परेड, नेपिअन्सी रोड सारख्या उच्चभ्रू वस्त्यांमधली कुत्रीमांजरीही अगदी रिबिन् बिबिन् लावलेले डिजाइनर् शूज् घालून हिंडताना आम्ही पाहिली आहेत. वार्धक्याकडे झुकू लागलेल्यांसाठी किंवा नेमाने लाफ्टर् क्लबात, प्रभातफेरीला (मॉर्निंग् वॉक् !) जिम् मध्ये जाणार्यां साठी स्पोर्ट्स शूज् ; कार्यालयात जाताना, लोकलमधून प्रवास करताना घालायचे चप्पल-बूट वेगळे नि मंगल कार्यालयात जातानाचे, प्रवासाला जातानाचे वेगळे; महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी आठवड्याला जो पोशाख घालायचा त्या प्रत्येक पोशाखामागे एक या दराने घालायचे चप्पल-बूट आणि सप्ताहाअंतीच्या स्नेहसंमेलनांसाठी, पार्ट्यांसाठी, ट्रेकिंग-हायकिंग साठीचे, लग्नमुंजीदी समारंभप्रसंगी घालायचे वेगळे बूट; असा सगळा जय्यत जामानिमा असतो. टाकून दिलेल्या चपला-बुटांचे पुनर्नवीकरण करायचे, पुनर्निर्माणाचे जे प्रकल्प धारावीसारख्या उद्योगजगतात आकाराला आले आहेत, त्यांच्या यशामागेही याच बहुरंगी बहुढंगी पादत्राणांचा फार मोठा हातगुण (की 'पाय'गुण) आहे.
पादत्राणे या शब्दांपासून तयार झालेल्या विशिष्ट शब्दचमत्कृतीची मजा बालसुलभवयात सगळ्यांनीच घेतलेली आहे, याबाबत दुमत नसावे. पण नेहमीची बस/ट्रेन पकडण्यासाठी धावताना अथवा ती चुकल्यावरची पायपीट करताना, शेजारी बसलेल्या किंवा उभे असलेल्या सहप्रवाशाच्या जड ब्यागेचा किंवा त्याच्या स्वतःच्या जडत्त्वाचा त्रास सहन करताना, टॅक्सी-रिक्षावाल्यांच्या संपासारख्या बिकट परिस्थितीत तंगडतोड करताना जी पायातले (पादण्यातले नव्हे! काढलेत ना दात लगेच?!) त्राण कायम ठेवतात ती पादत्राणे हा गर्भितार्थ केवळ अनुभवातूनच उलगडत जातो.
पूर्वी वधुपित्यांची पादत्राणे त्यांच्यातले त्राण जिवंत ठेवण्याऐवजी काढून घेत असल्याचे ऐकायला मिळे. मात्र हल्ली ऑनलाइन् म्याट्रिमोनीज् चे दिवस आल्यापासून हे चित्र आजकालच्या वधूंसारखेच काहीसे बदलू लागले आहे. पादत्राणांचा उपयोग फोटोत दिसणारी आपली उंची वाढवण्यासाठी, कोणत्या पोशाखावर कोणते चप्पल-बूट म्याच् होतात हा 'ड्रेसिंग् सेन्स्' दाखविण्यासाठी, आणि झालेच तर लग्नानंतर नवरा व बायको यांच्यापैकी कोणाच्या पायात किती त्राण उरणार नि कुणाचे किती संपणार, हे दाखविण्यासाठी केला जाऊ लागला आहे. एकंदरीतच चप्पल-बुटांमधील फ्याशनसंबंधी कमी पर्याय उपलब्ध असल्याने हा प्रकार वरांपेक्षा वधूंच्या बाबतीतच जास्त होतो, असे आमचे निरीक्षण आहे. गर्दीत पर्स किंवा गळ्यातली सोनसाखळी चोरणारा भुरटा चोर, विनाकारण मागे लागणारा रोड् रोमिओ किंवा नवखा, अननुभवी प्रेमवीर यांना प्रसाद म्हणून चढवायलाही आजकालच्या मुली पादत्राणांचा वापर करू लागल्या आहेत. त्यामुळे आता 'जुळले मनामनाचे नाते तुझे नि माझे' या ऐवजी 'जुळले बुटाबुटाचे नाडे तुझे नि माझे'; 'फुलले रे क्षण माऽझे फुलले रे' ऐवजी 'झिजले रे बुट माऽझे झिजले रे' अशी मंगलगीते कधी ऐकायला मिळणार याचीच आम्ही वाट पाहत आहोत. अशा बहुपयोगी उपलब्धीचे महत्त्व पटल्यामुळेच सारसबागेतला गणपती, अरण्येश्वर, पर्वती अशा ठिकाणांहून पादत्राणांच्या चोर्यां मध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेही ऐकायला मिळते आहे.
मागे भारताच्या माननीय गृहमंत्र्यांना बूट फेकून आपल्या इराकी मित्राचे अंधानुकरण करण्याचा चावटपणा एका शीख पत्रकाराने केल्याचे पाहण्यात आले. पण मुळातच शीख बाणा हा बुटासारखे तुच्छ हत्यार न वापरता लढवय्या वृत्तीने सीमेवर छातीचे कोट करून बंदुका चालवायचा (किंवा भारतात ट्रक नि अमेरिकेत-क्यानडात टॅक्सी चालवायचा) आहे. त्यामुळे इराकी पत्रकाराच्या बूट फेकण्यातला तो जोश या मा. पत्रकार सरदारजींच्या जोडा हाणण्यात दिसून आला नाही. आणि सदैव हसतमुख नि शांत असणारे आदरणीय गृहमंत्री सुरुवातीला जरी त्या अनपेक्षित प्रीतीसुमनांनी किंचित गांगरल्यासारखे वाटत असले, तरीसुद्धा पाडगावकरांच्या 'जेंव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा' च्या चालीवर 'जेंव्हा तुझ्या बुटांना उडवी दलेर माझा' असे काहीसे त्यांना सुचले असण्याची शक्यता त्यांच्या मिस्किल हसण्यावरून तरी अगदीच नाकारता यायची नाही.
किरर्र 
(संकलन)

Thursday, May 16, 2013

खूप मोठा हो ....!

 खूप मोठा हो....!
आपल्याकडं एखाद्या लहानानं नमस्कार केला तर मोठी माणसं आशीर्वाद देताना म्हणायची, ' चांगलं शीक, खूप मोठा हो '. मग ही मुलं-मुली शिकायची, नोकरी-व्यवसाय करायची, श्रीमंत व्हायची, स्थिर व्हायची. कालक्रमानं त्यांना वयाचं मोठेपण यायचं. त्यांचे बाप व्हायचे, आया व्हायच्या. आजी-आजोबा, मामा-माम्या, दादा-वहिनी... आणखी बरंच काही. यात नेतेबिते होणंही आलंच. शिक्षणाचं रूपांतर पैशात, वस्तूत व्हायचं, पण या सगळ्यात ' मोठं होण्याच्या प्रकल्पाचं ' काय व्हायचं कुठास ठाऊक ? बहुधा आशीर्वाद देणारेही याचा फारसा विचार करायचे नाहीत. त्यांच्यासमोर नवं मूल, नवा आशीर्वाद ' चांगलं शीक, खूप मोठा हो '.
आशीर्वाद भावनेनं ओथंबलेला असायचा. देणाऱ्याच्या स्नेहानं तो आर्द्र झालेला असे, पण ' मोठं होणं म्हणजे काय होणं '? याचा उलगडा या स्नेहातून व्हायचा नाही. मग या मोठं होण्याच्या प्रकल्पात जाऊ बघणाऱ्या मुलांवर भव्यतेचा मारा सुरू व्हायचा. इतिहासामधली भव्यता, भूतकाळातली भव्यता, संस्कृतीची भव्यता, धार्मिक भव्यता या सगळ्या भव्यतांमध्ये प्रतिमा असायच्या. नायकांच्या, प्रेषितांच्या, ईश्वराच्या प्रतिमा. हळूहळू भव्यतांच्या प्रतिमापूजनात आपण हरवून जायचो. आशीर्वादाचे पाणी वाहून गेलेले. सुखी आणि समृद्ध असण्याच्या जमिनीत आपली मुळं इतकी घट्ट रूजलेली की, आपण इतिकर्तव्यतेच्या भावनेत बुडून गेलेलो. आपली अशी पक्की धारणा झालेली की, आपल्याला व्हायचं तितकं मोठं आपण झालोय, आता करण्यासारखं काही शिल्लक नाही. मग भव्यतेच्या प्रतिमांचे उत्सव, त्यांचे जयजयकार मोठं होण्याच्या प्रकल्पात उतरूनही आपण खुजे राहिलोत या बोचणीवर मात करण्यासाठी, आपल्याला मोठेपणाचा अर्थ न कळण्याचा अपराधभाव दडपण्यासाठी, अधिक मोठ्या प्रतिमा, अधिक मोठे उत्सव, सतत नव्या प्रेषितांचा शोध. प्रतिमा, पुतळे गगनाला भिडलेले. त्यांच्यासाठी आपण हळवे, आक्रमक आणि चिथावणीखोर झालेलो.

अनंत काणेकरांचं ' विजेची वेल ' नावाचं एक ललित गद्याचं छोटंसं पुस्तक आहे. त्यात एक लेख आहे, ' मोठ्ठं. त्याहून मोठ्ठं '. त्यात त्यांनी या मोठं होण्याच्या पोकळ जाणीवहीन स्पर्धेविषयी लिहिलंय. काणेकरांनी लिहिलंय, ' खरोखरच मोठ्ठं मोठ्ठं करीत, मोठ्ठ्याच्या मागं खुळ्यासारखं धावण्यात काहीच अर्थ नाही. मोठी यंत्रं, मोठी शहरं, मोठ्या योजना, सर्वच मोठ्ठं करण्याच्या नादात, ज्या छोट्याशा माणूस नावाच्या प्राण्यासाठी हे सर्व चाललेलं असतं, तो बिचारा शिल्लकच राहत नाही. '


काणेकर लिहितात तेच आपल्या वर्तमानालाही लागू नाही का?. स्वतःच्या मोठं होण्याचे सोयीस्कर अर्थ लावले. खुजं राहण्याची चतुर समर्थनं शोधली. आपलं मोठं होणं म्हणजे प्रस्थापित होणं, सुबत्ता मिळवणं, पदांवरची - संपत्तीवरची अढळपदं मिळवणं, कुटुंबावर आणि आप्तांवर दबदबा मिळवणं. हितसंबंधांचं आणि सुरक्षिततेचं भक्कम जाळं उभा करणं, ते राखणं. मग एकांतात स्वतःचाच स्वतःला त्रास होऊ नये म्हणून भव्य प्रतिमांच्या पूजनाचे मायाजाल उभारणं. पण ही मोठं होण्याची तृष्णा कधीच संपत नाही. आपण जितक्या भव्य प्रतिमा उभारू तितके आपण जास्त खुजे दिसू. इमारत जितक्या उंच होत जातील तितका आपला कणा ठिसूळ होत जाईल. ज्या भव्यतेचा आपण अभिमान बाळगतोय ती कराल हास्य करीत आपल्यावर चालून येईल. आपलं शरीर लठ्ठ असेल, पण आपली प्रकृती नाजूक होईल.


काणेकर लिहितात, ' एकमेकांना खाण्याचा प्रयत्न न करता एकमेकांशी मिळून मिसळून राहण्यातच मजा आहे. ' हे एकमेक म्हणजे फक्त माणसं नव्हेत, सर्व स्थिरचर सृष्टी. आपल्या भक्ष्यांच्या विरोधात मोठमोठे जमाव जमवणं, या जमावांच्या दबावांनी आपली खाणी-गिळणी न्याय ठरवणं, मोठं होण्याच्या सगळ्या आशीर्वादांचा भ्रमनिरास असेल. खरं, अंतःकरणपूर्वक ' मोठं हो ' म्हणणं म्हणजे, ' तुझा पैस रूंदावू दे, तुझ्या आलिंगनाची कक्षा रुंदावू दे, भेदाभेदांचा आणि हव्यासाचा अंधार वितळून संवेदनेच्या मायाळू उजेडात तुला सगळं जग दिसू दे. लहानपणाची सार्थता कळून खुजेपणाची व्याधी सरू दे ' असं म्हणणं. अशा सदिच्छांनी आपला माथा उन्नत असो आणि अशा आशीर्वादांनी आपले भविष्य उजळून निघो. 
किर्रर्र 
(संकलन) 

Tuesday, May 14, 2013

लहानपण देगा देवा

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा…

आपले वय काय हो? असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते? मुलींना हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ मंडळी लगेच मनातल्या मनात आता रिटायरमेंटला किती वर्ष राहिले बुवा आणि अजून किती ’सर्व्हिस’ शिल्लक आहे याचाही हिशोब करायला लागतात. पण वय कितीही असले तरी प्रत्येकात एक लहान मूल लपलेले असते. आता काही म्हणतील छे… काही तरीच काय? पण माझे ऐका, आता मान्य कराच हे. तुम्ही कितीही म्हणालात तरी हे अगदी ख्खरं आहे. तेच लहान मूल ज्याला कधी कधी फार खोड्या कराव्याशा वाटतात.
कित्येकदा मला असे वाटलंय की एकदा तरी खूप जोरात ओरडून आरोळ्या ठोकाव्यात. उगाचच… काही कारण नसताना. का कुणास ठाऊक, पण वाटते. ट्रेकला गेलो की ही हौस मी भागवून घेतो. मला आठवतंय की ’कळसूबाईच्या नादखुळा ट्रेक’मध्ये शिखरावर पोचल्यावर मी पहिली गोष्ट केली ती म्हणजे जोरजोरात बोंब ठोकली अगदी इंग्लिशमध्ये scream म्हणतात तसे. शिवाय उगाचच इकडे तिकडे सैरावैरा धावून घेतले. आहे ना गंमत?
कधी आपल्याला वाटतेच ना रस्त्यात उगाचच एखाद्या गाडीला ’कट’ मारावा. अचानक कुणी मधे आले आणि मूड चांगला असला की आपण ओ काकू, ए मावशे जरा समोर पाहा, अप्पा जरा हळू असे खोडकर शब्द वापरतो. चौकातल्या पोलीसमामाची ढेरी फारच गरगरीत दिसते आणि त्यावर हळूच हात फिरवावासा वाटतो. कुणी तंबाखू चोळत उभा असला तर खालून हाताला धक्का मारावासा वाटतो.
अजूनही किती तरी वेळा आपण कुणी बसायच्या आधी त्याची खुर्ची हळूच ओढून बाजूला करतो. खूप दिवसांनी कुणाला भेटून सरप्राईज द्यायचे असेल तर मागून जाऊन त्याचे/तिचे डोळे गच्च झाकतो अथवा “भॉ” करतो. कुणाला खाली बसताना पाहिले की च्युइंगम ठेवावेसे वाटते ना तुम्हांला.
कॉलेजला असताना खूप वेळा बसमध्ये सीटच्या मधून खाली येणाऱ्या मुलींच्या ओढणीने आम्ही आमचे बूट पुसण्याचे उद्योग करायचो. किंवा शेजारी उभा असलेला माणूस तिकडे तोंड करुन उभा असेल तर हळूच त्याच्या शर्टच्या कापडाची क्वालिटी पाहून घ्यायचो.
कधी मनात आले की आपण उगाच हॉटेलमध्ये टिश्यू पेपरचे विमान, होडी असले काही बाही बनवतो आणि मग वेटर आपल्याकडे ’जरा हाललंय’ अशा नजरेने पाहतो. कितीही गंभीर सिनेमा असला तरी मला अजूनही पॉपकॉर्नची पिशवी फोडल्याशिवाय पैसे वसूल झाल्यासारखे वाटतच नाही. चित्रपट संपल्यावर कॉरिडॉरमधून बाहेर पडताना लोक इतके गप्प गप्प का असतात हे तर मला अजूनही कोडे उलगडले नाही. अशा वेळी मला ’इतना सन्नाटा क्यू है भाई’ अशी काडी लावून खो-खो हसावेसे वाटते. बागेत गेले की कधी उगाचच झोक्यावर बसावेसे वाटते किंबहुना अशा लोकांसाठीच ’खेळणी फक्त लहान मुलांसाठी आहेत’ असे फलक लावलेले असावेत. मग आपण हिरवळीवर लोळून हौस पूर्ण करुन घेतो. बागेतला फुगेवाला फुगा फुगवत असताना त्याला गुपचुप टाचणी मारावीशी वाटते.
मानवाला सततच्या आपल्या या बालसवयींची काळजी खूप प्राचीन काळापासून पडली असावी. म्हणूनच आपल्या लग्नात नवऱ्या मुलाचे कान पिळणे, बूट पळवणे, हळद खेळणे, वरमाईच्या डोक्यावर कुरड्या फोडणे असे प्रकार शास्त्रसंमत आहेत. वाजंत्री पथकातल्या पिपाणीवाल्यासमोर चिंचेचे बोटूक चोखायचे तर माझे कितीतरी दिवसांपासूनचे स्वप्न आहे. अगदी कॉर्पोरेट क्षेत्रातल्या सो कॉल्ड पर्सनालिटी डेव्हलपमेंटच्या गेममध्ये पण थोडा का होईना बालिशपणाचा अंश असतो. अगदी उच्च सुपरब्रॅंडच्या जाहिराती सुद्धा कित्येकदा या बालिशपणाभोवतीच घुटमळत असतात. किंबहुना अशाच जाहिराती खूप दिवस लक्षात राहतात. विश्वास नसेल तर ती ’धारा’ची “जलेबी…?” जाहिरात आठवा. टेलिव्हिजन क्षेत्राने तर आपली ही मेख केव्हाच ओळखली आहे, म्हणून तर आजकाल कित्येक कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी लहान मुलांवर टाकली आहे.
लहान मुलांमध्येच आपला जीव रमतो ना अजूनही? जगरहाटीच्या रॅटरेसमधून घरी गेल्यावर आपण घरात किंवा शेजारी लहान मूल असेल तर त्याच्या बरोबर मूल होऊन खेळतोच ना? (मी तरी खेळतो, आणि मला लहान व्हावेसे वाटते. पण त्या आमच्या शेजारच्या लहान मुलाला मोठे व्हावेसे वाटते. मला ऑफिसला जाताना विचारतो, पप्पू काका, टिफीन घेतला का? बॉटल भरुन घेतली का?”) मला सांगा कितीही आपण मोठे झालो तरी आपली टॉम अँड जेरी पाहायची सवय जाईल का? चॅनल सर्फ करताना कार्टून फिल्म्स दिसल्यावर आपण थबकतोच ना? किती तरी वेळा कुणाशी तरी मिस कॉलचा खेळ खेळत बसतो तोही या पोरकटपणापायीच. मी तर आजवर अशा अगणित खोड्या केल्या आहेत, अजूनही करत आहे आणि पुढेही करत राहणार यात तिळमात्र शंका नाही.
किर्रर्र
(संकलन)