Thursday, May 3, 2012

भेसळ



 काल बायकोने ठाण्याहून खर्वस मागवला होता... रात्री टी.वी . पहाता पहाता तो आम्ही चापला.
"कसा मस्त आहे की नाही ?"

हो ....छान आहे.दुधात जिलेटिन घालून केलेला "चिक" व त्यापासून बनवलेला खरवस मी पहिल्या चम्च्यात ओळ्खला होता . पण बयाको समोर हो ....छान आहे आसे म्हणावे लागले.

आमच्या गोठ्यात ( एके काळी ) वर्षाला ४ /५ म्हशी वीत असत. आणि मग खरवस , नासकोणी , खरवसाची बर्फी असे विविध प्रकार आई / आजी करत असत.

हे खरवस बनवणारे रोज २०० /२५०किलो खरवस बनवतात. तो दादर पर्यन्त अनेक "हाटेलात" पुरवतात.


आता विचार करा , २०० कि. खरवस बनवायला किमान १०० कि. चीक हवा > त्यासाठी कमीत कमी ५० म्हशी व्यायला पाहिजेत > त्यासाठी किमान ५००० म्हशी गोठ्यात हव्या. असे अनेक खरवस वाले मुंबापुरीत आहेत. मला तरी हे केवळ अशक्य वाट्ते.....एवध्या म्हशी बाळगण्या परीस तो गोठ्याची जागा विकून बक्कळ पैसा कमवेल.

थोडा विचार +विचारपुस करता " जिलेटिन " + दुध = खरवस हा फॉर्मुअला समजला.

बाटली बंद " लोणची " आणि त्यावर तरंगणारे तेल पाहून मला असाच संशय आला. गोडेतेलाची किंमत , लोण्च्यामधील तेलाचे प्रमाण व लोण्च्याची किंमत ह्याचा मेळ लागेना......
दोन चार ठिकाणी चापापणी केली . मग ऊलगडा झाला. " लोणच्या मध्ये वापरले जाणारे तेल गोडेतेल ( शेंगदाणा) नसून सरकीचे (कापुस बी )आसते.

बाजारात लस्सी प्यायची म्हट्ले की मला आठवण होते "सायट्रिक आसिड " ची . ब्लोटिंग पेपर + सायट्रिक आसिड = फक्कड लस्सी.

हेच सायट्रिक आसिड दूधाच्या भुकटी बरोबर आले की "छास " तय्यार. ताक प्यायल्यावर जिभेवर कडवट आंबट चव राहिली कि ओळखा ही सायट्रिक आसिड ची कमाल.

हे सायट्रिक आसिड / चुन्या बरोबर " पाणी-पुरी " मध्ये सापड्ते. चुना मिर्ची म्हणून न सायट्रिक आसिड चिंच म्हणून आपण पितो .....भैय्यजी थोडा पानी ऑर्.....कारण ही दोनिही रसायने मिर्ची व चिंचे पेक्शा खूप स्वस्त आहेत.

ऊसाचा रस ऊन्ह्ळ्यात चांगला . पण काही "कलाकार" ह्यामध्ये "सॅकरिन " वापरतात्..... थोढ्या रसात भरपूर पाणी +सॅकरिन = भरपूर रस व भरपूर नफा.पण ह्यचा वापर एवढा सर्रास नाही.

टोमॅटो सॉस केवळ "भोपळ्या पासून " बनवतात म्हणुनच हॉटेलातून बाटल्या भर्भरून ठेवलेला असतो व परवडतो .

नेस्ले / एच्.एल्.एल. इ. कंपन्या टोमॅटो सॉस टोमॅटोपासून बनवत असतील ही...

ही थोडी झलक.

एक चुना सोड्ल्यास ह्यामधील कोणतीही भेसळ शरीरास विशेष हानी कारक नाही. फक्त फसवणुक आहे .

शरीरास विशेष हानी कारक भेसळी विषयी परत केंव्हा तरी .

तो पर्यन्त " वडापावाच्या" लसूण चट्णीत " लाकडाचा नारळ /खोबरे / शेंगदाणा व समप्रमाणात
लाकडाचा भुसा / बारीक केलेला पुठ्ठा नाही ना ? एवढी खात्री करा झाले.

किर्रर 
(संकलन)

Wednesday, May 2, 2012

'बासरी 'ची आख्यायिका



 बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.
पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.

त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी 'मी' येतो.... याच 'मी'पणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.

कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या, आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो, पण तो आम्हाला साधा भावही देत नाही.

तू तर एवढी साधी; ना रूप ना काही. पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो.

तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर? बासरी हसली आणि म्हणाली, 'तुम्ही माझ्यासारख्या व्हा, मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल.'

अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं. बासरी पुढे म्हणाली, 'मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ, ना एखादं वळण. मी पोकळ आहे. त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार गळून पडलाय.

माझ्या अंगावरच्या सहा भोकांतून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत.

मला स्वत:चा आवाजही नाही.. माझ्या सख्यानं फुंकर मारली तरच मी बोलते.

तो जशी फुंकर मारतो तशी मी बोलते.' गोपी निरुत्तर झाल्या.

तेव्हापासून त्या बासरीवर रुसून आहेत.
किर्रर 
(संकलन)

Tuesday, May 1, 2012

कुठेतरी छानसे वाचलेले


सकाळी झोपेतुन जाग आल्यावर... उशीर झाला आहे हे
माहिती असतानाही... बाबांच्या मांडीवर डोकं ठेवुन
पुन्हा थोडा वेळ झोपण्यासारखं स्वर्गसुख इतर कुठलं
नाही. अशा वेळी बाप-लेकीचं प्रेम पाहुन
आईच्या चेहेर्यावरील आनंद सुद्धा हळुच पाहताना खुप
मजा येते. पण फ़क्त दोन-तीन दिवसच हे सुख मनात
साठवुन पुन्हा दुर जावं लागणार हा विचार मनात
आला की डोळे ओलावतात.
मनातला हुंदका बाबांना ऐकु जाऊ नये याचा अतोनात
प्रयत्न केला.. तरीही.. अस्थीर भावना बाबांपर्यंत
पोहोचतातच. हळुच बाबा डोक्यावर थोपटतात.
त्या एका मजबुत हाताच्या स्पर्शातुनच मग डोळे
पुसुन.. पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळते. देवाने
अशी काय जादु दिली आहे बाबांच्या हातामध्ये..
की केवळ थोपटण्याच्या स्पर्शातुन नवीन पंख
पसरायची उमेद मिळते. "बिनधास्त पुढे जा! लागेल तिथे
मदत करायला मी पाठीशी आहे. चुकलीस तर वाट
दाखवेन... बरोबर असलीस तर.. शक्य तितकं कौतुक
करेन!" या फ़क्त शब्दांनीच किती बळ येतं. अगदी..
गावाच्या वेशीतुन गाडी निघताना...
बाबांचा चेहेरा नजरेआड होई पर्यंत अश्रु रोखुन
धरण्याचं बळंही मिळतं... त्यांच्याच त्या उबदार
हातांच्या थोपटण्यातुन..!

किर्रर 
(संकलन)

क्रिएटीव किडा
















नमस्कार ,
हे ' क्रिएटीव किडा ' काय प्रकरण आहे ?
प्रत्येक माणसाच्या मनात वेगवेगळे विचार सतत येत असतात...काही चांगले , काही वाईट ...या विचारांचे पुढे काय होते ? या विचारामधूनच माणसाच्या व्यक्तिमत्वाची जडण घडण होत असते...आणि चांगले विचार जर गुंफण करून ठेवले तर ... जसे  मधमाशा मध साठवतात तसे हे चांगले विचार साठवले तर? हेच काम हा  क्रिएटीव किडा करणार आहे ...

किर्रर्र