Saturday, March 16, 2013

भारतीय स्त्री-सौंदर्य


भारतीय स्त्री-सौंदर्य

या जगात भारतीय स्त्री-सौंदर्य हेच खरे. मुंबै-दिल्ली-बंगळुरातले बिनबाह्यांचे आधुनिक आणि फ्यॅशनेबल स्त्री-सौंदर्य, पेशवाई ब्राह्मणी-कायस्थी -घाटी मराठी स्त्री-सौंदर्य, कधी अत्यंत देखण्या तर गुडीगुडी गोडगोड गुजराथी खमण-ठेपला अने ढोकलावाल्या भाभ्यांचे स्त्री-सौंदर्य, तर कधी लस्सीसारखे घट्ट-आव्हानात्मक-उफाड्याचे-मक्कई रोटीसारखे गरमागरम पंजाबी स्त्री-सौंदर्य! नखर्‍यानटव्याचे-लाडिक रुसव्याफुगव्याचे -होळीच्या रंगात नटलेले मथुरा-बनारसचे स्त्री-सौंदर्य, तर कधी नाजूक-नितळ कांतीचे परंतु त्याचसोबत बिर्याणीची खुशबू असलेले लखनवी-काश्मिरी मुसुलमानी पडदनशीन स्त्री-सौंदर्य, कधी रोशोगुल्ल्याइतकेच नाजूक-पटकन विरघळणारे मुनमुनसेनी स्त्री-सौंदर्य, तर कधी अजमेरी कलाकंदासारखे खमंग आणि बिकानेरी शेवेसारखे चविष्ट-आगे दुकाण अणे पिछ्छे मकाण असलेल्या मारवाड्याला हळूच आतल्या मकाणात बोलावून लाडिकपणे " अजि सुणोजी!" म्हणणारे राजस्थानी स्त्री-सौंदर्य! आणि सरतेशेवटी सुंदर मोकळा केशसंभार, आखीवरेखीव भुवया, सुंदर नाकेलं नाक, बोलके डोळे असलेलं,आणि जीवघेण्या आव्हानात्मक बांध्याचं दाक्षिणात्य स्त्री-सौंदर्य! असं हे विविधतेने नटलेलं भारतीय स्त्री-सौंदर्यच या जगात आम्हाला सर्वाधिक प्रिय आहे! नाय, तश्या तुमच्या अमेरिकन नी कोरियन, नी रशियन, नी विंगलंड, नी जापनीज बायड्या असतीलही छान, परंतु, स्त्री-सौंदर्य, रुचकर खाणंपिणं, आणि संगीत -गाणं-बजावणं, या तीन बाबतीत भारताइतकी महासत्ता कोणाकडेच नाही..! :) असो.. 

हा  लेख 'तुझे आहे तुजपाशी' मधल्या काकाजी देवासकरांना सादर समर्पित! 

किर्रर 
(संकलन)

No comments:

Post a Comment