मामाचं पत्र हरवलं !
मामाचं पत्र हरवलं !
पूर्वेकडुन..पश्चिमेकडे....
ज्या वयात शुभम् करोती म्हणायची त्या वयात...जॉनी जॉनी येस पापा म्हटल जातय......
माझ्या मामाच पत्र हरवलं म्हणत,
रिंगण घालुन तालासुरात फेर धरायचो पण आता कम्प्युटर मोबाईल्सच्या गेम्सच्या जमान्यात मामाच पत्र खरच हरवलय....
त्रिकोणी-चौकोनी कुटुम्बात "आजीच्या गोष्टी" हरवल्यात....
सुट्टीमध्ये मामाच गाव नक्की असायच.....पण हल्ली सुट्टीच नाही
मिळत...शाळेला मिळाली तरी क्लास्स सुरुच असतात....आणि मिळालीच तरी जवळच्या
डेस्टीनेशन वर घालवली जाते.......
फेसबुकवर वॉट्सएप वर रोज 10 जणांना "हाय" "हाउ आर यु" विचारणारे आपण........एकदाच आईला "कशी आहेस...." म्हणुन विचारतो का.....?
फेसबुक...वर तास तास गप्पा मारणारे आपण घरात एकत्र गप्पा मारायला बसतो का..?
7 ते 10 रुपयाच्या सिगरेट ...दिवसाला दहा दहा वेळा ओढताना....वाटत नाही का कुठे तरी चुकतोय आपण....?
हल्ली एन्जॉयमेन्टची डेफीनेशन बदलली आहे......दारु पिणे....नशेत गुंग होणे म्हणजे एन्जॉयमेण्ट....
ओबमा म्हणाले होते अमेरिकेसमोरची सगळ्या मोठी समस्या म्हणजे वाहवत चाललेली तिथली तरुण पीढी........आपणही त्याच मार्गावर आहोत का...?
विवेकानंदांचा तरुण भारत वाहवत चाललाय.....
गरज आहे जगण्याचा पाया आणि चालण्याचे बळ देणा-या तुकारामांच्या अभंगाची...
गरज आहे सावरकरांच्या राष्ट्रवादी विचारांची......
गरज आहे छत्रपती शिवाजींना मनात रुजवण्याची.....
गरज आहे पूर्वेकडुन..पश्चिमेकडे चाललेला हा प्रवास इथेच थांबवण्याची.....
किर्रर
(संकलन)
No comments:
Post a Comment